अंधत्वावर मात (संजय गावकर)

लहानपणापासून आयुष्याची सुरेख स्वप्ने
त्याने पहिली होती ती पूर्ण करण्यासाठी मेहनत
करून त्याने
अभियांत्रिकी विभागाची पदवीही मिळवली, मात्र
'रेटीना प्रीगमेंटसी' या डोळ्याच्या दुर्धर आजाराने
त्याला ग्रासलं आणि ऐन उमेदीत या तरुणाला अंधत्व
आलं. मात्र या अंधत्वाने खचून न जाता व्यवसायाचं
स्वप्न त्यानं साकार केले. राज्य
शासनाच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने
त्यांचा व्यवसाय बहरला. ठाण्याच्या संजय गावकर
यांच्या या संघर्षाची दाखल भारत
सरकारनेही घेतली असून
अपंगासाठी दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार
त्यांना जाहीर झाला आहे. 3 डिसेंबर राष्ट्रीय अपंग
दिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते
त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
गोवा, कर्नाटक सीमा भागातील कारवारमध्ये संजय
गावकर यांचा जन्म झाला. वडील सैन्य दलात
असल्याने मुंबई आणि कर्नाटकात संजय गावकर
यांचं प्राथमिक शिक्षण झालं. पुढे कळवा येथे कुटुंब
स्थायीक झालं आणि कळव्यातील इंग्रजी शाळेत
संजयचं शिक्षण झालं. तर ऐरोलीमधील दत्ता मेघे
कॉलेजमध्ये इंजिनियरिंगचा अभ्यासक्रमही पूर्ण
केला. अभ्यासामध्ये हुशार असल्याने संजय
यांना हा काळ सुखकर होता. याच काळात खेळामध्ये
ही त्यांनी प्राविण्य मिळवलं. अॅथेलेटिक्समध्ये 800
आणि 1500 मीटर मध्ये राज्य स्तरीय सुवर्णपदक
संजय यांनी प्राप्त केलं. खाजगी कंपन्यांमध्ये
शिकाऊ म्हणूनही काम करत होते.
स्वतःचा व्यवसाय करण्याचं स्वप्न मात्र कायम
होते.
संजय गावकर यांना वयाच्या 22 व्या वर्षापासून
डोळ्याचा त्रास सुरु झाला. डॉक्टरांनी आजाराचं
निदान केल्यानंतर संजय यांच्या पायाखालची वाळू
सरकली. पुढील काही दिवसांत डोळ्याने काहीच पाहू
शकणार नाही, या अत्यंत वेदनादायक वास्तवास
त्यांना सामोरं जावं लागलं. उपचारासाठी त्यांनी भारत
भर अनेक शहरात जाऊन प्रयत्न केले मात्र
त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर या असाध्य
रोगामुळे संजय यांना पूर्ण अंधत्व आलं. आता पुढे
भविष्य काय असा प्रश्न संजयला पडला,
एकदा आत्महत्येचा विचारही मनात आला होता मात्र
यावर मात करायचीच ही जिद्द बाळगत संजयने
सामाजिक संस्थांच्या मदतीने उभं राहायचं ठरवलं.
मात्र टेलिफोन ऑपरेटर सारख्या गोष्टी मध्ये
रमण्याचा संजय यांचा विचार नव्हता.
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास
महामंडळाकडून मदत
मिळवण्यासाठी सुरवातीला त्यांनी डेअरी उद्योगाची निवड
केली. मात्र संजय यांचे शिक्षण अभियांत्रिकीचं
असल्यामुळे याच क्षेत्रामध्ये उद्योग
करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला.
याच क्षेत्रातील संजयचा मित्र अतुल माळोदे
याच्या मदतीने सिद्धकला इंजिनियरिंग
या कंपनीची सुरवात केली. संजय यांना व्यवसाय
करण्यासाठी राज्य शासनाने साडेचार लाखांचे अनुदान
दिलं. त्यातून सुरु झालेला व्यवसाय आज 12
कोटीपर्यंत पोहोचला आहे. 45 कर्मचारी आणि 100
कामगार या कंपनीमध्ये कार्यरत आहेत.
राज्य शासन आणि नॅब यांनी संजय यांचा विविध
पुरस्काराने सन्मान केल्यानंतर
यंदाच्या अपंगांसाठीच्या राष्ट्रीय
पुरस्कारासाठी संजय गावकर यांची निवड झाली आहे.
3 डिसेंबरला नवी दिल्लीतील विज्ञान भवनामध्ये
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार
त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
जिद्द आणि चिकाटी तसंच आत्मविश्वास मनात
असेल तर या जगात काही ही शक्य आहे हेच
संजयच्या या प्रवासाने जाणवतं. त्यामुळे
तरुणांनीही कुठल्याही बाबतीत खचून न
जाता आत्मविश्वासाने काहीही शक्य आहे. हेच
संजयच्या या प्रवासातलं गुपित असल्याचं
संजयच्या बोलण्याने जाणवतं.

Post a Comment

0 Comments