दबंग सलमान खान

प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विथ
करन'च्या चौथ्या मोसमामधील एपिसोडमध्ये दबंग
सलमान खान पहिला पाहुणा होता. या शोचा होस्ट
करण जोहरसोबत त्याने दिलखुलास गप्पा मारल्या.
शाहरुख खानसोबतच्या कडव्या संबंधांपासून
एकेकाळी त्याच्या गर्ल्डफ्रेण्डस
राहिलेल्या ऐश्वर्या राय बच्चन आणि कतरिना कैफ
यांच्याबद्दलही त्याने भाष्य केलं.
'मी आणि शाहरुखने खूप वेळ एकत्र घालवला आहे.
मात्र हे पण खरं आहे की,
आता आम्ही पहिल्यासारखे मित्र कधीच बनणार
नाही,' असं सलमान, शाहरुख
खानसोबतच्या आपल्या संबंधांबद्दल
बोलताना म्हणाला.
आपण शाहरुखचा खूप आदर करतो, असंही सलमानने
स्वीकार केलं.
'शाहरुख आज ज्या स्थानावर आहे, ते
त्याच्या मेहनतीमुळे. जे लोक विचार करतात
की शाहरुखविषयी असभ्य शब्द वापरुन ते
माझ्याजवळ पोहोचतील, तर असा विचार करणं
चुकीचं आहे. शाहरुखला वाईट बोलणाऱ्यांना मीच गप्प
बसवतो,' असं सलमान म्हणाला.
लग्नाच्या जवळ
47 वर्षांचा सलमान खान कधी लग्नाबाबत विचार
करत नाही का, असा प्रश्न करणने सलमानला केला.
यावर तो म्हणाला की, 'मी एक-दोन
वेळा लग्नाच्या जवळ होतो. संगीता बिजलानीसोबत
असताना तर पत्रिकाही छापल्या होता, पण योग
जुळून आला नाही. कदाचित
माझ्या गर्लफ्रेण्ड्सना वाटतं की, अफेयरपर्यंत ठीक
आहे पण या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य कसं काढू
शकेन.'
तसंच जुन्या गर्लफ्रेण्डशी समोरासमोर सामना होतो,
त्यावेळी तो काय करतो. यावर सलमानने सांगितलं
की, आपणी दूर निघून जातो, जेणेकरुन भेटच
होण्याची वेळच येत नाही.
शिवाय संगीता बिजलानी आताही माझ्या संपर्कात
आहे आणि माझ्या कुटुंबाची चांगली मैत्रीण आहे,
असंही सलमानने सांगितलं.
'मी साधारण अभिनेता'
सलमान स्वत:ला कसा अभिनेता मानतो, यावर
तो म्हणाला की, मी साधारणपेक्षा कमी आहे.
माझ्या मते, 'दुसरे अभिनेते माझ्यापेक्षा अधिक
चांगले आहे. रोमँटिक सीनमध्ये शाहरुखची तुलनाच
होऊ शकत नाही. तर
आमीरसारखी निष्ठा आणि परफेक्शन
कोणामध्येही नाही. अक्षय कुमारमध्ये एक
अभिनेता मोठी सुधारणा झाली आहे. त्याचा कॉमिक
टायमिंग मस्त आहे.'
अभिनेत्रींमध्ये सलमान खानला दीपिका पादुकोण,
सोनाक्षी सिन्हा, प्रियांका चोप्रा आवडतात. तसंच
ऐश्वर्या राय बच्चनही चांगली अभिनेत्री आहे.
कोणत्या को अॅक्ट्रेससोबत लग्न करायला आवडेल,
असा प्रश्न विचारला असलाता सलमानने
प्रीती झिंटाचं नाव घेतलं.

Post a Comment

0 Comments