‘बाबा’ इस्लामपुर

सांगली: एखाद्याला जीव
लावला की त्याच्यासाठी जीव
द्यायची महाराष्ट्राची परंपरा. त्यातल्या त्यात
घरातलं कुत्रं-मांजर किंवा अगदी गाय म्हैस असेल
तर तिलाही खास घरातल्या सदस्यासारखंच वागवलं
जातं.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरातही मुंडे
कुटुंबाच्या घरात खास सदस्य आहे.
त्याची बडदास्तही तशीच ठेवली जाते
आणि वर्षाकाठी त्याचा वाढदिवसही झोकात
साजरा केला जातो. हा ‘बाबा’ म्हणजे लाडका बैल!
इस्लामपूरच्या चौकाचौकात लागलेले फ्लेक्स
सध्या चर्चेचा विषय आहे. कारण
एरव्ही नेत्या कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला लागणारे
फ्लेक्स यावेळी ऊस वाहणाऱ्या ‘बाबा’साठी लागले
आहेत.
उरुन परिसरात अर्शद मुंडेंचं कुटुंबं राहातं. 10
वर्षापूर्वी त्यांची परिस्थिती प्रचंड हलाखीची होती.
पण बाबा घरात आला आणि मुंडेंचं नशीब पालटलं.
एक फूट जमीन नसणाऱ्या मुंडेंनी बाबाच्या जीवावर
काही एकरची खरेदी केली. इस्लामपुरात टोलेजंग घर
बांधलं. त्यामुळं बाबा घरातलाच सदस्य झाला.
वर्षागणिक बाबाच्या वाढदिवसाची रौनक वाढत
जाते. यावर्षी तर दहा किलोचा केक. हजारभर
लोकांची पंगत, आतषबाजी आणि सुवासिनींकडून
औक्षण, असा जंगी कार्यक्रम होता.
बाबाला शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील
लोकांची गर्दी होती.
नेत्यांच्या वाढदिवशी होतात,
तशी छोटेखानी भाषणही झाली.
आता बाबाचा वाढदिवस आहे, म्हटल्यावर चर्चा तर
होणारच ना.
घरातल्या जनावरांप्रती आदर व्यक्त
करण्याची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे.
बाबाबद्दल बोलताना मुंडे
घरातल्या प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा ओलावतात.
‘बाबा’ला नावानंच हाक
मारायची हा मुंडेंच्या घरचा शिरस्ता आहे.
आता ‘बाबा’नं घराला एवढं भरभरुन दिलंय,
म्हटल्यावर वाढदिवसाला खर्च तर होणारच ना.

Post a Comment

0 Comments