22 वर्षीय श्वेताला गुगलची 1 कोटीची नोकरी

जालना: मागास समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील मुलीने कोटीच्या कोटी उड्डाण घेतलं आहे.
जालन्यातील एका मुलीला गुगलने तब्बल एक कोटी रुपये वार्षिक पगार देऊन नोकरीत सामावून घेतलं आहे. श्वेता करवा असं
या हुशार मुलीचं नाव आहे.
महत्त्वाचं म्हणजे 22 वर्षीय श्वेताची निवड ही कॅम्पस इंटरव्ह्यूवमधून झाली आहे.
श्वेताने आयआयटी दिल्लीमधून मॅथेमॅटिक्स अँड कम्प्युटर या विषयात एम. टेक केलं आहे. तर तिचं प्राथमिक
आणि माध्यमिक शिक्षण जालन्याच्या गोल्डन ज्युबली शाळेत झालं आहे. श्वेताचे आई वडील डॉक्टर आहेत.
श्वेताच्या या हुशारीच्या मोहात फक्त गुगलच नाही, तर गुगल इंडिया, गोल्डमन सॅच, रॉकेट फ्युअल
यासारख्या कंपन्याही आहेत. या कंपन्यांकडूनही श्वेताला ऑफर्स होत्या. मात्र श्वेताने गुगल यूएसची निवड केली.
या निवडीमुळे श्वेताचं स्वप्न साकार झालं झालं आहे.
श्वेताला पहिल्यापासूनच शिक्षणात रुची होती. मात्र आई वडिलांप्रमाणेच डॉक्टर व्हावं, असं तिला कधीही वाटलं नाही. गणित या विषयाची अत्यंत गोडी असल्यानं तिच्या अभ्यासात
कमालीची एकाग्रता कायमच दिसून आली.
श्वेताची २००७ साली दहावी झाली. दहावीत तिला ८२.४ टक्के गुण मिळाले. यानंतर तिने विज्ञानशाखेत प्रवेश घेतला. बारावीत तिला ८३ टक्के गुण मिळाल्याने तिने आयआयटी प्रवेश
परीक्षेची तयारी पूर्ण केली. त्यात ती यशस्वी झाली.
चार महिने सलग अठरा तास अभ्यास करून श्वेताने कोटीचं उड्डाण घेतलं आहे.

Post a Comment

0 Comments