शेतकऱ्याने भंगारातील दुचाकींपासून बनवलं वखरणी यंत्र

नाशिक: येवला तालुक्यातील एका प्रयोगशील
शेतकऱ्याने भंगारात पडलेल्या दुचाक्यांचा वापर करुन
वखरणी यंत्र तयार केलं आहे. या यंत्रामुळे
महागड्या बैलजोडीला एक उत्तम पर्याय उपलब्ध
झाला आहे.
शेती करणं आजच्या परिस्थितीत जिकिरीचं झालं
आहे. मशागत, खुरपणी यासारख्या शेतीच्या कामात
बैलजोडी आणि मजुरांची गरज प्रत्येक
शेतकऱ्याला लागतेच.
मजुरीचे दर वाढवूनही वेळेवर मजूर उपलब्ध होणं
दुरापास्तच. मजुरांच्या समस्येवर
तोडगा काढण्यासाठी येवल्यातील खिर्डी-
साठेच्या एका शेतकऱ्याने चक्क जुन्या दुचाकीपासून
विखरणी यंत्र तयार केलं.
कापूस, मका, भुईमूग या खरीप हंगामातील
पिकांच्या वखरणीसाठी या यंत्राचा उपयोग होत
आहे. विशेष म्हणजे या यंत्रामुळे
पैसा आणि वेळेची बचत होत आहे.
शिवाय याच यंत्रावर पिस्टन पंप बसवून ते
फवारणीसाठी उपयोगात आणलं जात आहे. अगोदर
बबन नागरे
यांनी सायकलच्या चाकाचा सांगाडा बनवून
कोळपणी यंत्र बनविले होते.
बबन नागरे यांनी अवघ्या अकरा हजार रुपयात
टाकाऊ वस्तूतून टिकाऊ असं यंत्र तयार केलं आहे.
या जोडगोळीचं हे यंत्र परिसरातील
शेतकऱ्यांसाठी कौतुकाचा विषय ठरला आहे.

Post a Comment

0 Comments