शेतकऱ्यांच्या यशोगाथा( शंकर झाडे)

सेलू (वर्धा) : विदर्भात पारंपारिक पद्धतीने
शेतीतली पिके घेतली जातात. यातही वर्षाला दोन
पिके, खरीपात कापूस, सोयाबीन तर रब्बीत हरभरा,
गहू अशी पिके घेतली जातात. वर्धा जिल्ह्यातील
एका शेतकऱ्याने या पारंपारिक पिक पद्धतीलाच बगल
देत फक्त चार एकरात वर्षाला चार पिके घेऊन
वर्षाकाठी लाखो रूपयांचा नफा वाढविण्याचं तंत्र
साध्य केलंय.
शंकर झाडे मागील 15 वर्षांपासून वडिलोपार्जित चार
एकरात शेती करतात. शाळेचं शिक्षण घेण्याचं गणित
त्यांना उमजलं नाही. मात्र कमी शेतीत जास्तीत
जास्त पिक घेत नफा वाढविण्याचं गणित मात्र
त्यांनी समजून घेतलं. झाडे हे चार एकरात
सुरवातीला सोयाबीन घेतात. गव्हाचं पिक
पेरणीला असलेल्या वेळेचं योग्य प्रकारे नियोजन केलं
आणि 45 दिवसाचं पालेभाज्यांचं पिक घेतलं. नंतर गहू
आणि उन्हाळ्यात सांभार म्हणजे कोथिंबीरीचं पिक ते
घेतात.
शंकर झाडे याचं नियोजन आणि व्यवस्थापन
सोयाबीन पिक काढताच चार दिवसात जमीन तयार
करून त्यावर मेथीची लावण केली जाते.
त्यासाठी सुरवातीला जमीन भुसभुशीत करून
घेतल्यानंतर त्यात मेथीचं बियाण फेकून दिलं. नंतर
सरी फाडून वाफे तयार करून घेतले. लावणीनंतर
दहा दिवसांनी सल्फेट आणि 18:18:10
आणि युरियाचा डोस दिला. सोबतच
उंची वाढावी आणि रंग टिकून राहावा यासाठी ए टू
झेड टॅानिकच्या स्वरुपात दिलं. आठवड्यातून फक्त
एकदा पाण्याचं नियोजन केलं.
मेथी हे पिक 45 दिवसाचं असल्यानं त्याला जास्त
फवारणी किंवा खते देण्याची गरज नाही. यामुळे
खर्च कमी आणि नफा जास्त होतो. तेही अवघ्या 45
दिवसातच हे शक्य होतं. शंकर झाडे याचं वर्षात
चार पिके घेण्याचं नियोजन 15 वर्षापासून सुरु आहे.
त्यांना पारंपारिक पिकात नुकसान ही झालं
तरी भाजीपाल्यासारख्या नगदी पिकातून ते
आपला नफा तोटा भरून काढतात.
झाडे यांच्या शेतीचं अर्थशास्त्र
मेथी लागवण करताना बियाणांसाठी 10 हजार
रुपयांचा खर्च आला.
खतासाठी आणि फवारणीसाठी रू. 3600 खर्च
लागला. दररोज सरासरी 11 क्विंटल
मेथी काढण्यासाठी 36 हजार रुपये मजूरीसाठी गेले.
त्याचबरोबर बाजारात माल विक्री होईपर्यंत
वाहतूक, दलाली, हमाली यासाठी एकूण 25 हजार
रूपयांचा खर्च आला. म्हणजे मेथीची लागवण
केल्यापासून तो बाजारात पोहोचवेपर्यंत त्यांना एकूण
75 हजार रूपयांचा खर्च आला. शंकर झाडे यांना 15
दिवसांमध्ये 168 क्विंटल मेथीचं उत्पादन झालं. यात
त्यांना वर्धा, केळझर, सेलू आणि हिंगणी येथील
बाजारपेठेत मेथी विकतांना सरासरी रू. 1600
असा भाव प्रति क्विटलला मिळाला.  मेथीच्या 45
दिवसाच्या पिकातून एकूण दोन लाख 65 हजार
रुपयाचं उत्पादन झालं. या उत्पन्नातून खर्चाचे 75
हजार रुपये वजा जाता एक लाख 90 हजार रुपये
ही त्यांची कमाई झाली.
शेती करताना पिकांचं नियोजन करून
नफा मिळविण्याचं तंत्र फक्त दुसरीपर्यंत
शिकलेल्या शंकर झाडे यांनी साध्य करुन दाखवलं
आहे. यंदा पावसाने सोयाबीनला फटका बसल्यामुळे
त्यात सेलू तालुक्यात पिकाचं मोठं नुकसान केलं.
तरीही शंकर झाडे यांनी चार एकरात 24 पोते
सोयाबिनचं उत्पादन घेतलं.
त्यानंतर त्यांनी 45 दिवसात दोन लाखांचं उत्पन्न
मेथीतून मिळवलं. आता मेथीनंतर ते गव्हाची लागवड
करणार आहेत. उन्हाळ्यात सांभाराला म्हणजे
कोथिंबीरीला चांगला भाव मिळतो म्हणून ते एक
महिन्यात येणारी कोथिंबीर घेतात.
एकीकडे शेतकरी शेती परवडत नसल्याचं सांगत
असतात. पण कमी शेतजमीन असून सुद्धा जास्त
पिक घेऊन अधिका अधिक
नफा मिळविण्यासाठी योग्य नियोजन केल्यास
शेती कशी परवडणारी ठरु शकते याचं हे चांगलं
उदाहरण म्हणावं लागेल.

Post a Comment

0 Comments