वाटतं कधी- कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटतं कधी- कधी आपलही कुणी असावं.....!!

ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,

ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,

बसून ह्दयात मग शांतपणे रहावं....!



हक्काने कुणावर
तरी कधीतरी रुसावं.....,

मग त्याच्याच समजूतीने क्षणभर विसावं....!


वाटतं कधी- कधी आपलही कुणी असावं.....!!



वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं......,

ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं.....!

वाटत कधी-कधी कुणाच तरी होउन पाहावं.....,

कुणाच्यातरी प्रेमात
आपणही न्हाउन निघावं....!.
वाटतं कधी- कधी आपलही कुणी असावं.....!!



वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं.....,

क्षणभर का होइना स्वतःला विसरुन बघावं......!

वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं.....,

लिहीता- लिहीता का होइना आपणही प्रेमात
पडावं.....!!



वाटतं कधी- कधी आपलही कुणी असावं.....!

Post a Comment

0 Comments