`व्हॉटसअप`वर करा `फ्री व्हॉईस कॉलिंग

नुकतंच, फेसबुकनं तब्बल १९ बिलियन डॉलरला खरेदी केलेलं चॅटींग अॅप्लिकेशन व्हॉटसअप आता एका नव्या फिचरवर कामाला लागलंय. यामध्ये तुम्हाला आता फक्त चॅटींगचीच नाही तर `फ्री व्हॉईस कॉल`चीही सुविधा उपलब्ध होणार आहे.

व्हॉटसअपचे सीईओ आणि फाऊंडर जेन कोऊम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही सुविधा केवळ अँड्राईड आणि आयफोनच्या यूजर्ससाठी उपलब्ध होऊ शकेल परंतु, लवकरच ही सुविधा ब्लॅकबेरी आणि विंडोज फोनसाठीही उपलब्ध करून देण्यात येईल.

बार्सिलोनामध्ये आयोजित केलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसला संबोधित करताना कोऊम यांनी ही माहिती दिलीय. या नव्या फिचरमुळे यूजर्स आपल्या मित्र-मैत्रिणींशी आणि नातेवाईकांशी प्रत्येक क्षणाला कनेक्टेड राहू शकतील मग ते जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात का असेना...

लोकांना एकमेकांशी जोडण्यासाठी व्हॉटसअपची ही सुविधा टेक्नॉलॉजी क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असं कंपनीला वाटतंय.

`फेसबुक`नं विकत घेतलं असलं तरी कंपनीच्या योजनांमध्ये काहीही फरक पडणार नाही... व्हॉटसअप ही एका स्वतंत्र कंपनीप्रमाणेच आपलं काम सुरू ठेवेल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

Post a Comment

0 Comments